Home महाराष्ट्र शिर्डीत 18 रोजी रंगणार कुस्त्यांचा थरार

शिर्डीत 18 रोजी रंगणार कुस्त्यांचा थरार

14
0

शिर्डी : श्रीराम नवमी उत्सव निमित्त श्री साईबाबांच्या पावन पुण्यनगरीत श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने गुरुवार 18 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता अग्निशमन केंद्रा जवळील साईबाबा क्रीडा मैदानात कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे.

7 हजार रुपयांपासून ते 51 हजार रुपयापर्यंतच्या कुस्त्या पहायला मिळणार आहे. योगेश पवार, संग्राम पाटील, अमित चौधरी,अनिल ब्राह्मणे, बंटी कुमार, शुभम पाचोरे, पप्पू काळे आदी नामांकित पैलवान सहभागी होणार आहेत.दरम्यान महिला कुस्तीपटूंची कुस्ती होणार आहे. कुस्ती मैदानाचे समालोचन प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे ब्राम्हणीकर हे करणार आहेत.

डोळ्यांची पारणे फेडणाऱ्या एकास एक अशा कुस्त्या होणार असून परिसरातील कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन आयोजक समिती, ग्रामस्थ शिर्डी यांच्यावतीने करण्यात येत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here