Home महाराष्ट्र मानोरी गावची यात्रा उत्साहात

मानोरी गावची यात्रा उत्साहात

92
0

मानोरी :  राहुरी तालुक्यातील मानोरी येथील सदरूद्दीन बाबा यात्रा उत्सवा निमित्त सोमवार 15 एप्रिल रोजी सायंकाळी कुस्त्याचा जंगी हंगामा पार पडला.

ब्राह्मणी येथील नामांकित मल्ल अनिल ब्राह्मणे,राम वने,नगरचा लक्ष्मण धनगर, राहुल पालवे,आदित्य काळे यांच्या कुस्त्या या मैदानात लक्षवेधी ठरल्या.

महिला कुस्तीपटू ईश्वरी जावध, श्रावणी तनपुरे, दिक्षा सोनवणे यांच्या कुस्त्या झाल्या. गावकऱ्यांनी त्यांचा फेटा बांधून सन्मान केला. याप्रसंगी जिल्ह्यासह राज्यभरातून नामांकित मल्ल,वस्ताद यांनी हजेरी लावली होती. कुस्ती प्रेमींची मोठी गर्दी पहायला मिळाली. अनेकांनी कुस्तीसाठी वैयक्तिक बक्षीस दिले.

परजिल्ह्यातून आलेल्या पैलवानांचा बक्षीस देऊन यात्रा उत्सव समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. कुस्ती मैदानाच उत्कृष्ट समालोचन पत्रकार गणेश हापसे ब्राम्हणीकर यांनी केले. कुस्तीचा इतिहास परंपरा, आजी-माजी पैलवानांचं कार्य, मैदानातील उपस्थित पैलवानांचा नामोल्लेख करत पहाडी आवाजातील बहारदार अशा कुस्ती समालोचनाच मानोरी परिसरातील कुस्ती प्रेमी ग्रामस्थांनी कौतुक केल. कुस्ती मैदानासह यात्रा यशस्वीततेसाठी अध्यक्ष भास्कर भिंगारे, उपाध्यक्ष मनोज भाऊ खुळे, खजिनदार पिरखाभाई पठाण,सहकारी सदस्य गावकरी, ग्रामस्थ कुस्तीप्रेमी,मल्ल यांनी सहकार्य केले.

मानोरीत सालाबादप्रमाणे यावर्षी सदरूद्दीन बाबा यात्रा उत्सवात सदरूद्दीन बाबा यांची संदल मिरवणूक,छबिना मिरवणूक,जंगी कुस्त्यांचा हगामा,प्रतिभा राणी तमाशा मंडळाचा बहुरंगी तमाशा व सकाळी हज-याचां कार्यक्रम पार पडला. मंगळवारी बैल गाडा शर्यत पार पडली.अन् यात्रा उत्सवाची उत्सवात सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here