Home राजकीय ब्राम्हणीत मंगळवार पासून हरिनाम सप्ताह

ब्राम्हणीत मंगळवार पासून हरिनाम सप्ताह

43
0

राहुरी – श्री क्षेत्र ब्राम्हणी येथे आदिशक्ती मुक्ताई समाधी सोहळ्यानिमित्त सालाबादप्रमाणे ब्राम्हणी येथे मंगळवार 28 मे पासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होत आहे.

28 मे ते 4 जून दरम्यान आयोजित किर्तन महोत्सव 7 ते 9 यावेळेत भागवताचार्य विष्णु महाराज झिने, श्रीकांत महाराज गागरे, साध्वी आरती ताई शिंदे, निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, सुखदेव महाराज गाडेकर, आदिशक्ती मुक्ताई पुण्यतिथीनिमित्त 2 जून रोजी सकाळी लक्ष्मण महाराज कदम, सायंकाळी संपत महाराज हांडे,आदिनाथ महाराज लाड आदी नामांकित महाराजांचे किर्तन होणार आहे.

4 जून रोजी सकाळी देवगड संस्थानचे उत्तराधिकारी हभप प्रकाशानंदगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.तरी परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक समिती व ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here