Home राहुरी इयत्ता दहावीत बानकर स्कूल 100 नंबरी

इयत्ता दहावीत बानकर स्कूल 100 नंबरी

89
0

ब्राम्हणी : पंढरी प्रतिष्ठान संचलित स्व.विलास बानकर स्कूल व ज्युनियर कॉलेजचा इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल लागला आहे.स्कूलची यशाची उज्वल परंपरा कायम टिकून आहे.

वेदांती किरण बानकर हिने 95.00 % मिळून प्रथम क्रमांकi मिळविला.तर,वेदिका विजय तरवडे, चैताली उत्तम बानकर,खुशी यशवंत खेमनर या तीन विद्यार्थींना समान (94.20%) गुण मिळाल्याने त्या द्वितीय ठरल्या.कुणाल सचिन आढाव 92.40 टक्के मिळवून तृतीय ठरला.ओम नानासाहेब जरे याने 91.80 गुण मिळवून चतुर्थ क्रमांक मिळविला.अपर्णा दहिफळे (91.40) गुण मिळवीत स्कूलमध्ये पाचवी तर श्रावणी आढाव ( 91.00) सहावा क्रमांक मिळविला.

यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य अश्विनी बानकर,उपप्राचार्य मधुबाला बानकर,इयत्ता दहावीच्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे मार्गदर्शक पंढरीनाथ बानकर,अध्यक्ष बाळकृष्ण बानकर, विश्वस्त प्रा.किरण बानकर व माजी सरपंच प्रकाश बानकर आदींनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here