Home महाराष्ट्र वारकऱ्यांना वेध…आषाढवारीचे

वारकऱ्यांना वेध…आषाढवारीचे

35
0

ब्राम्हणी – दरवर्षी आषाढी वारी निमित्त श्री क्षेत्र ब्राह्मणी ते श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या श्री संत मुक्ताबाई पायी दिंडी पालखी सोहळ्याचे 2 जुलै रोजी ब्राम्हणी येथून प्रस्थान होणार आहे.


मंगळवार 2 जुलै रोजी दुपारी ब्राम्हणी गावातील देवी मंदिर येथून पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे.शेकडो वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात.बहुतांश ग्रामस्थ पालखीलांवाट लावण्यासाठी उपस्थित असतात.यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असते.13 दिवसाचा पायी प्रवास असून 14 जुलै रोजी पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे.15 जुलै रोजी सकाळी पंढरपुरात आदिशक्ती संत मुक्ताई पालखी सोहळ्याची भव्य मिरवणूक प्रदक्षिणा निघणार आहे.

तरी वारकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. भास्कर तारडे 9552772403,भाऊसाहेब खोसे 9096110410,नामदेव देशमुख 9730463529 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पालखी सोहळा सेवेकरी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here