Home राहुरी श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभमुहूर्तावर पशुपालकांसाठी भेट

श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभमुहूर्तावर पशुपालकांसाठी भेट

53
0
 • ब्राह्मणी ॲग्रोमाईंड फार्मरचा उपक्रम
  दूध उत्पादकांसाठी चर्चासत्र
  पशुपालकांना मिनरल मिक्स्चरचे वाटप
  ब्राम्हणी : अयोध्या नगरीत प्रभू रामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून ब्राह्मणी ॲग्रोमाईंड फार्मर प्रोडूसर कंपनी लिमटेडच्यावतीने दूध उत्पादकांसाठी चर्चासत्र ठेवण्यात आले होते. यामध्ये दूध व्यवसायात येणाऱ्या अडचणीवर सखोल चर्चा करण्यात आली. भविष्यात येणाऱ्या काळात प्रत्येक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करून दूध उत्पादक सभासदांच्या पाठीशी ब्राह्मणी ॲग्रोमाईंड फार्मर प्रोडूसर कंपनी खंबीरपणे उभी राहील असे आश्वासन कंपनीचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ वने यांनी दिले.
 • या कार्यक्रमास ब्राह्मणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश माणिक तारडे व सर्व ब्राह्मणी ॲग्रोमाईंड फार्मर प्रोडूसर कंपनीचे दूध उत्पादक सभासद व ब्राह्मणी ॲग्रोमाईंड फार्मर प्रोडूसर कंपनी लिमटेडची सर्व टीम व ग्रामस्थ उपस्थित होते. यानिमित्त ब्राह्मणी ग्रामपंचायत उपसरपंच गणेश माणिक तारडे यांच्या हस्ते मिनरल मिक्स्चरचे वाटप करण्यात आले.
 • ब्राह्मणी ॲग्रोमाईंड फार्मर प्रोडूसर कंपनी नेहमी शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम राबवून शेतकरी व सभासदांना मार्गदर्शन करते.
  कंपनी शेतकऱ्यांसाठी तळमळीने काम करत असल्याचे पाहून उपसरपंच गणेश तारडे यांनी कंपनी एक ब्राह्मणी मॉडेल बनवून भविष्यात खूप मोठे क्रांती घडवेल असे प्रतिपादन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here