Home राहुरी संजय बानकर यांचे निधन

संजय बानकर यांचे निधन

30
0

सोनई: शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक संजय बानकर यांचे अल्पशा आजाराने आज मंगळवार 23 जानेवारी रोजी पहाटे नगरच्या खाजगी रुग्णालयात निधन झाले.. शनिशिंगणापुर आमरधाम येथे 11 ते 12 दरम्यान शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी देवस्थानचे आजी माजी अध्यक्ष विश्वस्त मंडळ, आजी माजी मुख्य कार्यकारी अधिकारी,कर्मचारी,नातेवाईक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी अध्यक्ष स्व.बाबुराव दादा बानकर यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात ते सेवेत रुजू झाले. सन 1987 ते 2324 असे एकूण 36 वर्ष त्यांनी शनि दरबारात सेवा केली. सुरुवातीला बोटावर मोजण्या इतकेच कर्मचारी सेवेत होते.तेव्हापासून आज हजारो कर्मचाऱ्यांसमवेत त्यांनी काम केले.अतिशय नम्र, शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख राहिली.

व्यवस्थापक पदाची एवढी मोठी जबाबदारी सांभाळताना कधी चिडचिडपणा कधी दिसला नाही.अन् कधी कोणाला ओरडताना ते पहिला मिळाले.हे विशेष


त्यांच्या निधनाने देवस्थान पदाधिकारी,कर्मचारी वर्तुळाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली असा परिवार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here