Home Blog पाचवा आरोपी ताब्यात

पाचवा आरोपी ताब्यात

88
0

राहुरी – वकील दांपत्याचा खून प्रकरणातील पाचवा आरोपी राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतला.

राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 75/2024 मध्ये वकील दांपत्यास कोर्टातून पळून नेऊन त्यांचा खून करून विहिरीत टाकणाऱ्या पाच जणांच्या टोळीपैकी चार आरोपी 27 जानेवारी 2024 रोजी अटक करण्यात आलेले होते.फरार पाचवा आरोपी नामे कृष्णा उर्फ बबन सुनील मोरे, राहणार उंबरे याचे बाबत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना त्याच्या ठाव ठिकाण बाबत गोपनीय माहिती मिळाल्याने सदर माहितीच्या आधारे पोलीस स्टेशनचे तपास पथक व वांबोरी बीट चे पथकाने त्यास तात्काळ अटक केली.

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोउपनी चारुदत्त खोंडे, पोहे का पारधी, पोका अंकुश भोसले, पोका सतीश कुराडे, पोहेका विकास साळवे ,पोहेका अशोक शिंदे,पोना नागरगोजे ,पोका पाखरे, पोना बागुल असे सदरची कामगिरी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here