Home राहुरी विश्वमाऊलीच्या विद्यार्थांचे यश

विश्वमाऊलीच्या विद्यार्थांचे यश

60
0

राहुरी : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय आयोजित संगीत विशारद परीक्षेत राहुरी तालुक्यातील उंबरे येथील विश्वमाऊली आध्यात्मिक गुरूकुलच्या एकूण सुमारे 52 बालवारकरी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये अनेकांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला.

 

गत अनेक वर्षापासून गुरुकुलचे प्रमुख ह .भ.प आदिनाथ महाराज दुशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वमाऊली आध्यात्मिक गुरूकुलमध्ये अनेक विद्यार्थी आध्यात्मिक शिक्षणाचे धडे गिरवित आहे.अभ्यास,शिस्त,वेळेचे नियोजन असे महत्वाचे शिक्षण विद्यार्थी घेत आहे.यशस्वी स्पर्धकांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.