Home राहुरी राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रीनअपची भरारी

राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रीनअपची भरारी

59
0

ब्राम्हणी : कृषी क्षेत्रात विविध शासकीय उपक्रमाच्या माध्यमातून आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून तयार झालेल्या मूल्यासाखळी अधिक बळकट व्हाव्यात यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून या अंतर्गत ब्राम्हणी येथील ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कंपनीचा विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत भागीदारी करार संपन्न झाला आहे. विशेष म्हणजे हे करार राज्य सरकारच्या पुढाकाराने संपन्न झाले.या करारामुळे ग्रीनअपच्या सभासद शेतकऱ्यांना मूल्य साखळी विकासाद्वारे फायदा होणार आहे.

ब्राम्हणी परिसरात अल्पावधीत नावरूपास आलेल्या ग्रीनअप कंपनीच्या माध्यमातून सोयाबीन आणि गव्हाची मोठी उलाढाल होत आहे. ग्रीनअप कंपनीने या दोन्ही पिकांच्या मूल्यासाखळीचे मॉडेल तयार केले असून राज्यभरातील एकमेव यशस्वी मॉडेल आहे. तसेच ग्रीनअप कंपनीने लॉंच केलेल्या सोनामोती गव्हाला देश विदेशातुन मागणी आहे.

सोनामोती गव्हामुळे ग्रीनअप समूहाची राज्यात नवी ओळख तयार झालेली असून ग्रीनअप च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोनामोती गव्हाची भेट देण्यात आली. विशेष बाब म्हणजे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ग्रीनअपचे व्यवस्थापकीय संचालक सचिन ठुबे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ओळख करून दिली व ग्रीनअप ऍक्टिव्ह कंपनी असल्याचा उल्लेख केला. सोमवारी मुंबईमध्ये सह्याद्री अतिथी गृह येथे कृषी भागीदारी बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे,राज्याचे सचिव अनुप कुमार, प्रधान सचिव एकनाथ डवले, VSTF चे आयुक्त प्रवीण परदेशी, कृषी आयुक्त डॉ प्रवीण गेदाम, स्मार्टचे मुख्य संचालक कौस्तुभ दिवेगावकर, डॉ राजाराम दिघे, दशरथ तांभाले आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यातील निवडक कंपन्यांना राज्य सरकारने प्रमोट केले असून त्यांच्या माध्यमातून शेतमाल विक्रीची शास्वत व्यवस्था उभी करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी या उपक्रमात अहमदनगर जिल्हयातील एकमेव ग्रीनअप कंपनीचा सहभाग असून ही गोष्ट ब्राम्हणी व परिसरातील सभासद शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here