Home राहुरी `ती` रांगोळी वेधते सर्वांचे लक्ष

`ती` रांगोळी वेधते सर्वांचे लक्ष

24
0

 

गणराज्य न्यूज ब्राम्हणी : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर 25 जानेवारी सायंकाळी ब्राह्मणी सहकारी सोसायटी व सहकारी बँक समोरील काढण्यात आलेली ती सुबक व आकर्षक रांगोळी आज 30 जानेवारी अखेर तशीच असून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

गत तीन चार वर्षापासून जिल्हा सहकारी बँकेच्या ब्राह्मणी शाखेतील जुनियर ऑफिसर स्नेहल दीपक तारडे या 1 मे,26 जानेवारी व 15 ऑगस्ट रोजी च्या पार्श्वभूमीवर नाविन्यपूर्ण रांगोळी काढत असतात.या माध्यमातून त्यांची आवड,कला कौशल्य जोपासत उत्कृष्ट रांगोळी रेखाटण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो.

 

 

रांगोळी आर्टिस्ट सौ.स्नेहल तारडे (जूनियर ऑफिसर ए.डी.सी.बँक शाखा ब्राह्मणी)

 

22 जानेवारी संपूर्ण देशभर प्रभू रामचंद्र यांचा सोहळा पार पडला.तीच थीम व क्रेझ 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या विविध कार्यक्रमात सर्वांना पाहायला मिळाली.

26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला सौ.स्नेहल तारडे यांनी रांगोळीत मंदिर प्रतिकृती साकारत त्यावर भगवा ध्वज व जय श्रीराम नाव साकारले..

आज पाच दिवस होवून रांगोळी आहे तशीच दिसून येते. दैनंदिन कामानिमित्त सहकारी बँकेत येणारे ग्राहक खातेदार व सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळासह सभासदांकडून या रांगोळीचा तोंड भरून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here