Home राहुरी संजय गांधी योजनेचे काम कौतुकास्पद : तांबे

संजय गांधी योजनेचे काम कौतुकास्पद : तांबे

39
0

राहुरी : संजय गांधी निराधार योजनेचे काम कौतुकास्पद आहे.असे प्रतिपादन झेडपीचे माजी सदस्य विक्रम तांबे यांनी व्यक्त केले.

गावोगावी जावून वंचित लाभार्थ्यांचा शोध घेत त्यांचे प्रकरण मंजुर करत त्यांना आर्थिक आधार दिला जात आहे.त्यामुळे लाभार्थ्यांना आता लाभ घेणे सोयीस्कर होत आहे.असे तांबे म्हणाले. ब्राम्हणी व परिसरातील वंचित लाभार्थ्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयात आमच्याकडे प्रत्यक्ष भेट घेवून प्रस्ताव द्यावेत. असे आवाहन सौ.प्रा.सुवर्णा बानकर यांनी केले.

ब्राम्हणी सहकारी सोसायटी सभागृहात आज शुक्रवार 2 रोजी सकाळी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रकरण मंजुरीचे पत्र सरपंच सौ.प्रा.सुवर्णाताई बानकर यांच्या हस्ते देण्यात आले.
संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष पत्रकार विनित धसाळ,भाजपा तालुकाध्यक्ष सुरेशराव बानकर, माजी जि.प.सदस्य विक्रमराव तांबे, ब्राह्मणी सोसायटीचे चेअरमन दादासाहेब हापसे,व्हाचेअरमन श्रीकृष्ण तेलोरे, माजी सरपंच प्रकाश बानकर, माजी उपसरपंच नितीन नितीन हापसे,ग्रामपंचायत सदस्य महेंद्र तांबे,अरुण बानकर, सौ.सुमन ठुबे, सौ.आशाबाई वाकडे  तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब देशमुख,बाबासाहेब गायकवाड, संचालक अशोक नगरे,अनिल ठूबे, संतोष हापसे, राजेंद्र गायकवाड, प्रभाकर साठे, बाजीराव अडसुरे,पोपट हापसे, गंगाधर बानकर,डॉ. विजय राजदेव,गोपीनाथ हापसे, चंद्रकांत बल्लाळ, गंगाधर बानकर,पत्रकार दत्तात्रय तरवडे,पत्रकार गणेश हापसे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here