Home राहुरी केलवड गावच्या यात्रा उत्सवास प्रारंभ

केलवड गावच्या यात्रा उत्सवास प्रारंभ

54
0

राहाता : तालुक्यातील केलवड गावच श्रद्धास्थान श्री. वीरभद्र महाराज यात्रा उत्सवास बुधवार 28 फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला.

बुधवार रात्री 8 वाजता जागरण गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार 29 रोजी सकाळी 7 वाजता अभिषेक 8 ते 11 भव्य काठी मिरवणूक दुपारी 3 वाजता बैलगाडा शर्यत रात्री 9 वाजता डफाचा खेळ व फटाक्यांची आतिषबाजी पहायला मिळणार आहे.

शुक्रवार 1 मार्च रोजी 4 वाजता भव्य कुस्ती मैदान व रात्री 9 वाजता सविता राणी पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा व शनिवारी 2 मार्च रोजी हजेरी कार्यक्रम होवून यात्रा उत्सवाची सांगता होणार आहे.
यंदा चार दिवस यात्रा उत्सवाचे नियोजन करण्यात येत आहे. यात्रा उत्सव यशस्वीततेसाठी यात्रा कमिटी सदस्य व केलवड ग्रामस्थ प्रयत्नशिल आहेत. चार दिवसाच्या कालावधीत आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होऊन ग्रामस्थांनी सहकार्य करावे.असे आवाहन श्री वीरभद्र महाराज यात्रा उत्सव समिती, केलवड यांच्यावतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here