Home राहुरी वंजारवाडीत पाणी वापर संस्थेच्या निवडणुकीत वाद

वंजारवाडीत पाणी वापर संस्थेच्या निवडणुकीत वाद

47
0

नेवासा – तालुक्यातील वंजारवाडी येथे रविवारी सकाळी पाणी वापर संस्थेच्या निवडणुकी दरम्यान दोन गटात वाद झाला.

गत आठ दिवस दोन्ही गटाकडून निवडणुकीचा मोठ्या प्रमाणात प्रचार झाला. सत्ताधारी व विरोधी दोन्ही गटाने निवडणूक मोठी प्रतिष्ठेची केली आहे.

मतदानाच्या दिवशी सकाळपासून उमेदवार दोन्ही गटाचे कार्यकर्ते यांची गर्दी पहायला मिळाली.सोनई पोलीस कर्मचाऱ्यांनी सुरुवातीपासून कडेकोट बंदोबस्त ठेवला.मात्र, वार्ड क्रमांक एकवर दोन गटात बाचाबाची झाली.अन् वाद झाला. सदर घटनेची माहिती पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली लागलीच मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. मतदान केंद्रा भोवती पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाला आहे. सायंकाळी मतमोजणी दरम्यान आणखी बंदोबस्त वाढण्याची शक्यता आहे.

लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद ग्रामपंचायत या निवडणुकीप्रमाणे वंजारवाडी गावची पाणी वापर संस्थेची निवडणूक जिल्ह्यासह राज्यात यानिमित्ताने चर्चेचा विषय ठरत आहे. वंजारवाडी, ब्राह्मणी, बेल्हेकरवाडी,खेडले परमानंद या गावातील लाभार्थी शेतकरी या संस्थेची सभासद आहेत.
यशवंत पाणी वापर संस्थेच्या 12 संचालक पदाच्या जागेसाठी आज रविवार 3 मार्च रोजी मतदान होत आहे.

यशवंत पाणी वापर संस्थेच्या 12 जागेसाठी दोन्ही गटाकडून 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. एकूण 487 मतदार सभासद मतदार आहेत.सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच मतमोजणी सुरू होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विलास पाटील काम पाहत आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी 24 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. सोनई पोलीस ठाण्याचे एपीआय शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here