Home राहुरी मंजाबापू (आण्णा) घुगरे यांचे निधन

मंजाबापू (आण्णा) घुगरे यांचे निधन

25
0

ब्राम्हणी : गावातील एक कष्टाळू, सर्वसामान्य व्यक्तिमत्व मंजाबापू (आण्णा) मालुजी घुगरे यांचे आज पहाटे ०४:३० वा. निधन झाले.
ते गत काही दिवसापासून आजारी होते. त्यांचा अंत्यविधी आज ठिक सकाळी ०९:०० वा.ब्राह्मणी बस स्टॅन्ड येथील अमरधाम येथे होणार आहे.

ब्राह्मणी सहकारी सोसायटीत त्यांनी खत डेपोत अनेक दिवस काम केले. चेअरमन संचालक, सभासद यांनी कोणतेही काम सांगितले तर अण्णा वयाचा विचार न करता ते काम करत असत. प्रत्येकाला काय साहेब बोला साहेब असच बोलत होते. लहानग्यापासून थोरापर्यंत सर्वांची कामे आण्णा करत होते.

ब्राह्मणी गावात व परिसरातील अखंड हरिनाम सप्ताहात, पायी दिंडी सोहळ्यात, विविध धार्मिक कार्यक्रमातील शोभा यात्रेत ते भालदार चोपदाराची उत्कृष्ट भूमिका बजावत असत. आण्णाची उणीव व जाणीव कायम असेल.

गणराज्य न्युज परिवाराकडून अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली…..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here