Home Blog मयत मित्राच्या परिवाराला आर्थिक मदत

मयत मित्राच्या परिवाराला आर्थिक मदत

70
0

सोनई –
नेवासा तालुक्यातल्या सोनईत दर रविवारी वाहन मेळावा भरत असतो. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. स्व. दादा वाघ यांनी सुरु केलेली ही परंपरा त्यांची मुलं जपत आहेत. दरम्यान, या परिवारातल्या अतुल बाबुराव गडाख या सदस्याचं 20 मार्च रोजी निधन झालं. शुक्रवारी (दि. 29) त्यांच्या दशक्रियाविधीच्या निमित्तानं आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळाच्यावतीनं एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला.

मयत अतुल गडाखच्या परिवाराला 1 लाख 51 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्धार करण्यात आला. मयत अतुल गडाख याच्या मुला – मुलींच्या शिक्षणासाठी या आर्थिक मदतीचा सदुपयोग केला जाणार आहे.

सोनईचे सरपंच धनंजय वाघ, मल्हारी वाघ, संजय (अण्णा) वाघ, भाऊसाहेब भुसाळ आदींसह सोनईतल्या व्यापारी मित्र मंडळाच्या अनेक सदस्यांनी यासाठी पुढाकार घेतला. या उपक्रमाबद्दल आमदार शंकरराव गडाख मित्रमंडळाच्या सदस्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here