Home अहमदनगर साई माऊली ट्रॅक्टर्स राहुरीकरांच्या सेवेत

साई माऊली ट्रॅक्टर्स राहुरीकरांच्या सेवेत

20
0

साई माऊली ट्रॅक्टर्स राहुरीकरांच्या सेवेत

राहुरीत साई माऊली ट्रॅक्टर्स राहुरी शाखेचा शुभारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महंत ह.भ.प उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन शुभारंभ करण्यात आला.

व्यवसायात मराठी पाऊल पुढे येत असल्याचा आनंद आहे.व्यवसाय प्रामाणिक व जिद्दीने केला.तर,यश निश्चित मिळते.राजकारणात पडण्यापेक्षा व्यवसायाकडे अधिक लक्ष देवून आपला प्रपंच आर्थिक दृष्ट्या सक्षम करावा. गाडे व जोजार बंधूनी व्यवसाय जपला.

ग्राहकाला देव मानले.म्हणून ते आज यशस्वी झालेत.पहिल्याच दिवशी 10 12 ट्रॅक्टरची बुकिंग होते.हे कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन हभ.प उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.

साई माऊली ट्रॅक्टर्सचे संचालक बंडूभाऊ उर्फ शंकर गाडे, प्रभाकर गाडे,किशोर जोजर यांनी उपस्थित सर्वाचे स्वागत केले.यावेळी गेणु मामा तोडमल,बाळासाहेब नानाभाऊ गाडे,विलास धिमते,एरिया मॅनेजर बिरेंदर सिंग, डेमोस्टेर नितीन जाधव, फील्ड ऑफिसर संदीप घुले, एमडी घुगरकर जालिंदर पाटील गाडे, बालू भाऊ तनपुरे,राजू मोरे,बाळासाहेब खुळे, दत्तात्रेय कंगावणे, मच्छिंद्र सोनवणे, किसनराव जवरे, नितीन कोल्हापुरे, सचिन देसरडा, भास्करराव गाडे,भारत भूजाडी,विकास तरवडे, पंकज तरवडे आदी यावेळी उपस्थित होते.उपस्थित सर्वाचे आभार किशोर जोजार यांनी मानले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here