Home राहुरी लाभार्थ्यांनो आधार बँक खात्याशी लिंक करा

लाभार्थ्यांनो आधार बँक खात्याशी लिंक करा

7
0

राहुरी- संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ व इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजना अनुदानाचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांचे अनुदान यापुढे आता डीबीटीच्या माध्यमातुन वितरित करण्यात येणार असल्याने सर्व लाभार्थ्यांनी आपले बँकखाते आधारकार्डाशी लिंक करून घ्यावे असे आवाहन राहुरी तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष पत्रकार विनित धसाळ यांनी केले आहे.

याबाबत माहिती देताना धसाळ यांनी सांगितले की, राहुरी तालुका संजय गांधी योजनेचे अनुदान यापुढे एप्रिल महिन्यापासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या ( डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर) माध्यमातून वितरित केले जाणार आहे. त्यामुळे लाभार्थी यांच्या ज्या बँकखात्यात अनुदान जमा होते त्या राष्ट्रीयकृत बँक खात्याशी आधारकार्ड (लिंक) संलग्न असणे गरजेचे आहे. जर आधार कार्ड बॅक खात्याशी लिंक नसेल तर संबंधीत लाभार्थी यांना एप्रीलचे अनुदान मिळणार नाही व त्यासाठी लाभार्थी स्वतः जबाबदार असणार आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपले बँकखाते आधार कार्ड लिंक करून घ्यावे असे आवाहन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विनित धसाळ यांच्यासह तहसीलदार नामदेव पाटील, नायब तहसीलदार सचिन औटी, संजय गांधी शाखेचे सर्व कर्मचारी व समितीचे सर्व सदस्य यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here