Home राहुरी राहुरीतील ते रस्ते दुरुस्त करा-अन्यथा आंदोलन

राहुरीतील ते रस्ते दुरुस्त करा-अन्यथा आंदोलन

19
0

राहुरी : भुयारी गटारी योजनेच्या कामादरम्यान राहुरी शहर व उपनगरातील रस्ते खराब झाले असून त्यावर तात्काळ मुरूम अथवा काँग्रॅटीकरण करावे अशी मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

युवा नेते हर्ष तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरीतील आजी माजी नगरसेवक,कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांना बुधवारी निवेदन दिले.यावेळी माजी.नगराध्यक्ष अनिल कासार नगरसेवक प्रकाश भुजाडी, बाळासाहेब उंडे, सूर्यकांत भुजाडी, शहाजी जाधव, संजय साळवे, अशोक आहेर, दशरथ पोपळघट, विजय डौले , संतोष आघाव, महेश उदावंत ,अशोक कदम, संदीप सोनवणे, राजेंद्र जाधव, नरेंद्र शिंदे, ज्ञानेश्वर जगधने ,किशोर पातोरे, सत्तारभाई शेख आदी उपस्थित होते.
सदर कामाचा त्वरित विचार करावा अन्यथा नागरिकांच्या वतीने नगरपालिकेसमोर भव्य आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here