Home राहुरी अंतरवाली सराटीच्या उपोषणाची दखल घ्या..

अंतरवाली सराटीच्या उपोषणाची दखल घ्या..

24
0

राहुरी – अंतरवाली सराटीत गत पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणास बसलेले आहे.त्यांची तब्येत घालवली आहे. मराठा कुणबी सगे-सोयऱ्यांना तात्काळ आरक्षण मिळावे.यासाठी सदर उपोषणाची प्रशासन व सरकारने दखल घ्यावी अन्यथा राहुरीत दोन दिवसात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.असे सकल मराठा समाजाच्यावतीने तहसीलदार व पोलीस प्रशासन यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

बुधवारी दुपारी छत्रपती धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे,दिव्यांग प्रहार संघटनेचे मधुकर घाडगे, सुभाष जुदरे, संदीप आढाव,राजेंद्र खोजे,राहुल तमनर, दत्तात्रय म्हसे,गणेश खुळे,सुभाष आदिनाथ तारडे,देवा देशमुख,आदिनाथ शेटे,निलेश गोसावी आदीसह शेकडो मराठा बांधवांच्या उपस्थितीत तहसीलदार नामदेव पाटील व ठाणे अंमलदार याच्याकडे निवेदन देण्यात आले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here