Home राहुरी
56
0

राहुरी : तालुक्यातील उंबरे येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सुरेश साबळे, उपसरपंच आदिनाथ पटारे,ग्रामविकास अधिकारी रगड व शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर विद्यार्थी कृषिदूत ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमासाठी उंबरे येथे आले आहेत. डॉ. विखे-पाटील कृषी महाविद्यालय व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय, विळद घाट येथे हे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. कार्यक्रम समन्वयक प्रा. किरण दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत सागर कर्डिले, प्रेम कोठुळे, रोशन लोहकरे, सुमित मंडलिक, संकेत नळे हे थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कृषिदूतांनी अभ्यासलेल्या माहितीचा व ज्ञानाचा शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे. कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतातील मातीपरीक्षण,फळबाग व्यवस्थापन, आदी विषयांवर ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.बी. धोंडे, उपप्राचार्य डॉ. एस.बी. राऊत, प्रा. डॉ. एच.एल. शिरसाठ, प्रा. डॉ. बी.व्ही. गायकवाड, प्रा. पी. सी. ठोंबरे आणि सर्व कार्यक्रम अधिकारी व महाविद्यालयातील सर्व विषय तज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे .

: तालुक्यातील उंबरे येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सुरेश साबळे, उपसरपंच आदिनाथ पटारे,ग्रामविकास अधिकारी रगड व शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर विद्यार्थी कृषिदूत ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमासाठी उंबरे येथे आले आहेत. डॉ. विखे-पाटील कृषी महाविद्यालय व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय, विळद घाट येथे हे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. कार्यक्रम समन्वयक प्रा. किरण दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत सागर कर्डिले, प्रेम कोठुळे, रोशन लोहकरे, सुमित मंडलिक, संकेत नळे हे थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कृषिदूतांनी अभ्यासलेल्या माहितीचा व ज्ञानाचा शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे. कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतातील मातीपरीक्षण,फळबाग व्यवस्थापन, आदी विषयांवर ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.बी. धोंडे, उपप्राचार्य डॉ. एस.बी. राऊत, प्रा. डॉ. एच.एल. शिरसाठ, प्रा. डॉ. बी.व्ही. गायकवाड, प्रा. पी. सी. ठोंबरे आणि सर्व कार्यक्रम अधिकारी व महाविद्यालयातील सर्व विषय तज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here