Home Blog बिहारमधून अल्पवयीन मुलीला फुस लावून आणले

बिहारमधून अल्पवयीन मुलीला फुस लावून आणले

66
0

राहुरी : अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून आणल्या प्रकरणी सदर तरुणा विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

बिहार येथील १९ वर्षीय मुस्लिम तरुणाने एका १६ वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीला फूस लावून राहुरीतील ब्राम्हणी गावात पळवून आणले होते.

पिडीत मुलीवर अत्याचार होत असल्याचे समजताच ब्राम्हणी गावात काही लोक जमा झाले. त्यांनी संबंधित तरुणाची यथेच्छ धुलाई करत त्याला राहुरी पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र या घटनेमुळे जिल्ह्यात पून्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे.

बिहार येथील अफताब बादशाह साई या मुस्लिम तरुणाने तेथीलच एका आठवी इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन हिंदू मुलीला खोटी नाटी माहिती देऊन फूस लावून पळवून आणले. गेल्या तीन महिन्यांपासून तो तरुण पिडीत मुली बरोबर राहुरी तालूक्यातील ब्राम्हणी येथे त्याच्या नातेवाईकांच्या घरी राहत होता. या दरम्यान संबंधित तरुणाच्या नात्यातील दुसरा एक तरुण तीच्यावर अत्याचार करत असल्याने पिडीत मुलीने सदर माहिती तीच्या बिहार येथील बहिणीला फोन करुन सांगीतली. पिडीत मुलीची बहिण आज दिनांक १३ जानेवारी २०२४ रोजी राहुरी येथील ब्राम्हणी गावात आली. पिडीत मुलीने सर्व हकिगत तीच्या बहिणीला सांगीतली. या घटनेची माहिती गावातील नागरिकांना मिळाली. यावेळी परिसरातील शेकडो नागरिक जमा झाले. जमावाकडून संबंधित तरुणाची यथेच्छ धुलाई करत त्याला राहुरी पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी पिडीत मुलगी बिहार येथुन बेपत्ता झाल्याची तक्रार तेथील पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात पून्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली.या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गून्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here