Home अहमदनगर बाल आनंद मेळावा उत्साहात

बाल आनंद मेळावा उत्साहात

86
0

सोनई : येथील सुजाता इंटरनॅशनल स्कूलचा यावर्षीचा बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला.

30 डिसेंबर रोजी 2023 या सरत्याच्या वर्षाच्या दिवशी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य, याबरोबरच इतर खाद्यपदार्थातून आपल्या शरीराला उपयुक्त असलेले विटामिन यांची माहिती व्हावी व विद्यार्थ्यांनी घरून स्वतः बनवून आणलेल्या खाद्यपदार्थांची त्यांना स्वतः विविध स्टॉल लावून त्याची विक्री कशी करतात ? याबरोबरच व्यावसायिक ज्ञान, बरोबरच आरोग्य विषयी खाद्यपदार्थ किती महत्त्वाचे आहेत ? शरीराला कोणत्या पदार्थापासून कोणते जीवनसत्व मिळतात ? हे कळवण्यासाठी 30डिसेंबर रोजी सायंकाळी 5.00 ते 10.00 वाजेपर्यंत बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जवळजवळ विद्यार्थ्यांचे ५० स्टॉल लागले होते. यावर दोन विद्यार्थी मिळून एका स्टॉलवर विविध प्रकारचे विटामिन युक्त खाद्यपदार्थ यांचे प्लेटा सजवून खवय्यांसाठी सज्ज होत्या.

विविध प्रकारचे स्टॉलला नाव देऊन विद्यार्थ्यांसमवेत पालकही महिला भगिनी उपस्थित होत्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्था मध्ये उपमा, डोसा इडली, व्हेज बिर्याणी, भेळ, पकोडा, मेथी पकोडा, पालक भजी, मेथी भजी, पाणीपुरी, मंचुरियन, व्हेज पुलाव, लिंबूयुक्त सरबत, पोहे, कळण्याची भाकर, पालक दशमी, तसेच विविध वृक्षाचे असे विविध प्रकारचे वेगवेगळे 50 पेक्षा जास्त खाद्यपदार्थ बनवलेले होते यामध्ये प्रत्येकाने आपली खरी कमाई केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना आपले आई – वडील कष्ट करून आपल्याला सकाळी डब्बा करून देण्यासाठी आईची होणारी तारांबळ कळाली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आई-वडील शिक्षक यांच्या विषयी कृतज्ञता ही आपल्या बोलण्यातून व्यक्त केली तसेच या कार्यक्रमाला सुमारे पाच हजाराहून पालकांनी व परिसरातील ग्रामस्थ व नागरिकांनी भेट दिली व पाच लाखांहून अधिक रुपयांची उलाढाल या कार्यक्रमातून झाली अशी माहिती संस्थापक किरण सोनवणे यांनी दिली दरम्यान कार्यकमाची सुरुवात स्वरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री धनंजय वाघ सरपंच सोनई ग्रामपंचायत,श्री प्रसाद हरकळे उपसरपंच सोनई ग्रामपंचायत श्री राजाभाऊ बोरुडे माजी सरपंच सोनई ग्रामपंचायत, श्री उदय आबा पालवे विश्वस्त मुळा एज्यूकेशन सोसायटी तसेच श्री किरण सोनवणे संस्थापक सुजाता इंटरनॅशनल स्कुल सोनई आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला नर्सरी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध हिंदी मराठी गीतांवर नृत्य सादर केले तसेच कार्यक्रमात रंगत भरली तसेच सांस्कृतिक कार्यक्रमा दरम्यान महिलांना साठी मनोरंजक प्रश्नमंजुशेचा कार्यक्रम घेण्यात आला त्यात 10 विजयी महिलांना स्पर्धकांना शाळेच्या वतीने गिफ्ट्स देऊन सन्मानित करण्यात आले शाळेच्या प्राचार्या ज्योती सोनवणे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here