Home अहमदनगर दीपउत्सवाने संत ज्ञानेश्वर मंदिर उजळून निघाले

दीपउत्सवाने संत ज्ञानेश्वर मंदिर उजळून निघाले

126
0
दीपउत्सवाने संत ज्ञानेश्वर मंदिर उजळून निघाले

नेवासा:  श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास 727 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोरील प्रांगणात करण्यात आलेल्या दीपउत्सवाने संत ज्ञानेश्वर मंदिर उजळून निघाले.

या दीपोत्सवाप्रसंगी मंदिराचे अध्यक्ष मा.आ. पांडुरंग अभंग यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पैस खांबाची विधीवत पूजन करण्यात येऊन पैस खांबासह माऊली समोर क्षेत्र आळंदी येथील समाधी मंदिरातुन आणलेल्या ज्योत ने मंदिरातील पहिला दिवा पेटवण्यात आला. आ. शंकरराव गडाख व हिंदू राजे मित्र मंडळाच्यावतीने हि ज्योत आणली होती. तदनंतर ओम आकाराच्या बनविण्यात आलेल्या प्रतिकृतीमध्ये संस्थानचे अध्यक्ष मा.आ. पांडुरंग अभंग, डॉ करण घुले, विश्वस्त कैलास जाधव, कृष्णा पिसोटे, सुरेश ढोकणे, अनिल ताके, अ‍ॅड के.एच. वाखुरे, देविदास साळुंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव चौधरी यांच्यासह संत, महंत व सर्व विश्वस्तांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here