Home क्राईम मालट्रक व मोटरसायकलची धडक

मालट्रक व मोटरसायकलची धडक

44
0

 राहुरी : फॅक्टरी येथे ७ जानेवारी रोजी रात्री मालट्रक व मोटरसायकलची समोरासमोर धडक होवून ३४ वर्षीय मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राहुरी तालूक्यातील चिंचविहिरे येथील योगेश सुभाष पानसंबळ, (वय ३४ वर्षे) ७ जानेवारी रोजी रात्री ८.४५ वाजे दरम्यान राहुरी फॅक्टरीकडून ताहराबादकडे मोटरसायकलवर जात होते. त्यावेळी एक मालट्रक राहुरीकडून श्रीरामपूर कडे जात होता. राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड राज्य महामार्गावर श्रीरामपूर चौक येथे मालट्रक व मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली.

तेव्हा योगेश सुभाष पानसंबळ हे मालट्रक ची धडक बसून रस्त्यावर पडले. त्यावेळी त्यांच्या अंगावरुन मालट्रकचे चाक गेल्याने ते जागीच गतप्राण झाले. योगेश सुभाष पानसंबळ यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, जुळ्या मुली असा परिवार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here