Home राहुरी ब्राह्मणीतील कर्तुत्वान तरुणाच निधन

ब्राह्मणीतील कर्तुत्वान तरुणाच निधन

97
0

गणराज्य न्यूज ब्राम्हणी : गावातील एक कर्तुत्वान तरुण, कुटुंबाचा कर्ता, घरातील एकतुलता एक मुलगा, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी प्रवीण राजेंद्र देशमुख यांचे आज सायंकाळी हृदयविकाराने दुर्दैवी निधन झाले.

त्यांचा अंत्यविधी आज 1 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता देवीची तळे येेेेथे होईल. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक बहिण,दोन चुलते,चुलत भाऊ,असा परिवार आहे.नामदेव देशमुख व संजय देशमुख यांचे ते पुतणे तर दिपक देशमुख व आकाश देशमुख यांचे ते बंधू होते.

काही वर्षांपूर्वी वडील राजेंद्र देशमुख यांचे निधन झाले.त्या पाठोपाठ मुलगा प्रवीण आज अचानक जग सोडून गेला. देशमुख परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळा आहे.अतिशय शांत, मनमिळाऊ स्वभाव आणि प्रामाणिक, कष्टाळू व्यक्तिमत्त्व, सतत हसतमुख चेहरा असलेला प्रवीण आज अचानक आपल्याला सोडून गेला..प्रवीण यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here