Home अहमदनगर अवैद्य धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले

अवैद्य धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले

109
0

ganarajya news effect ब्राम्हणी – ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे ब्राम्हणी गावातील सर्रास व उघडपणे सुरू अवैध धंदे एवढ्या दिवस बंद असल्याचा प्रथमच इतिहास घडला.आता हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद राहिल्यास राज्यात ब्राम्हणीची याबाबतीत एक आदर्श गाव म्हणून एक वेगळी ओळख निर्माण होईल हे निश्चित.त्यासाठी ग्रामपंचायत व पोलिसांची भूमिका यापुढे महत्वाची ठरणार आहे. अन्यथा पुन्हा हेच धंदे सुरू झाल्यास नवल वाटायला नको. अवैध धंदे बंद असल्याचे समजताच ग्रामस्थांकडून आता कौतुक होत आहे.

ब्राह्मणी गाव गुण्यागोविंदाने सामाजिक सलोखा जपणारा गाव, ऐतिहासिक,धार्मिक सांस्कृतिक परंपरा जोपासणारे गाव म्हणून ब्राह्मणीची ओळख जिल्ह्यासह राज्यात आहे.पण याच गावात गत काही दिवसापासून अवैध धंद्याची जणू स्पर्धा सुरू झाली होती. मध्यंतरी बाहेरगावच्या लोकांनी गावात धंदे सुरू केले.यातून वाढती गुन्हेगारी दिसून येत होती. अवैध दारूच्या टपऱ्या दुकानासह सोराट, मटका, आकड्यांच्या खेळांची प्रशस्त अशी दुकाने थाटली गेली. बाजार तळाच्या मध्यवस्तीतील आकड्यांची दुकाने चर्चेचा विषय ठरली होती. शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, बेरोजगार तरुण या खेळाच्या आहारी जाण्यास सुरुवात झाली. भविष्याच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे. या सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार करत गणराज्य न्यूजने गत आठवड्यापूर्वी यावर प्रकाश टाकला. बातमी प्रसिद्ध झाली.वाचकांनी कौतुक केल.

दरम्यान ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीत निर्भीडपणे जागृत सदस्यांनी ठराव मांडत आपल कर्तव्य पार पाडले. ५ जानेवारीच्या ग्रामसभेत अवैध व्यवसायावर महाचर्चा घडली. यामध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थांनी या चर्चेत भाग घेत अवैध धंदे बंद करण्याचा एल्गार पुकारला.त्यानुसार ग्रामपंचायत प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाला दारूसह अन्य अवैध धंदे बंद करण्याचा ठराव सुपूर्द करण्यात आला. ग्रामसभेत चर्चा होणार असल्याचे संकेत मिळालेल्या अवैध धंदे व्यवसायिकांनी सभेच्या दिवशीच आपली दुकाने बंद केली होती.आज सोमवारचा चौथा दिवस उगवला. सर्रासपणे उघड चालणारे अवैध व्यवसाय बंद असल्याचे दिसून आले. ग्रामपंचायतच्या त्या ठरावची दखल घेणाऱ्या पोलिसांनी ब्राह्मणीच्या अवैध धंद्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केल.अन् कारवाईला सुरुवात केली.जेथे पूर्वी कारवाई झाली तेथे आता पोलीस कारवाई करताना दिसून येत आहे.

निर्भीडपणे कारवाई करत असल्याने या प्रकरणात पोलिसांची मान उंचावली असल्याचे दिसून येत आहे. फक्त कारवाई दरम्यान दुजा-भाव नको हिच अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. ज्या दुकानातून उघडपणे अवैध धंदा चालतो ते जरी बंद असले.तरी,अन्य दुकानाच्या व्यवसायाच्या आडून कोणी काही उद्योग करीत नाही ना?याची पडताळणी पोलिसांनी करण्याची गरज आहे. चोरून लपून उद्योग चालू राहिल्यास? कायमस्वरूपी हा धंदा बंद पडण अशक्य आहे.ते करण्यासाठी अचूक. काम करावे लागेल..एवढेच…!

ग्रामपंचायतची नवी बॉडी अस्तित्वात आली. सरपंच सुवर्णा सुरेश बानकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतची पहिली मासिक बैठक पार पडली.अन् याच बैठकीत गावाच्या दृष्टीने हानिकारक असा महत्त्वाचा अवैध धंद्याचा विषय चर्चेचा ठरला. जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपल कर्तव्य काय याची जाणीव ठेवत सदस्य शांताराम  हापसे यांनी सदर मुद्दा मासिक बैठकीत उपस्थित केला.अन् त्यास गणेश  तारडे यांनी अनुमोदन दिले.अन् पुन्हा ग्रामसभेत यावर महाचर्चा घडली. सदस्य ग्रामस्थांनी अवेध धंद्याविरोधात आवाज उठविला.अन् त्याच दिवसापासून जाहीरपणे सुरू असलेले धंदे बंद असल्याचे दिसून आले. यापूर्वी अनेक सभेत ग्रामसभेत चर्चा घडली.मात्र,त्याचा परिणाम दिसला नव्हता .तेवढ्या पुरते..नगर,श्रीरामपूर पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने चुकून एखाद्या दिवशी धदे बंद असल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी प्रथमच चार दिवस झाले. त्या दुकानांना टपऱ्यांना टाळ असल्याचे दिसून आले.फक्त शेजारच्या दुकानातून चोरून लपून चालू तर नाही.एवढीच साशकंता व्यक्त केली जात आहे.कारण काहींचे त्याच शेजारी अन्य व्यवसाय आहेत.अन् त्या ठिकाणी होत असेल लक्ष दिलं पाहिले.नसेल विकली जात तर पोलीस प्रशासनाच नक्कीच अधिक कौतुक होईल .

गावातील अवैध धंदे बंद झाल्याने महिला भगिनींकडून ग्रामपंचायत पोलीस व ग्रामसभेत प्रश्न उपस्थित करणाऱ्या जागृत ग्रामस्थांचं कौतुक करण्यात येत आहे.

उद्या मंगळवार ब्राम्हणी गावचा आठवडे बाजार,या दिवशी बाजार तळालगत दरवेळी पान टपरीच्या आडून दारू विक्री होती.पिणारे येणाऱ्या जाणाऱ्या न लाजता दारू नरड्यात रिजतात.महिला बाजारला मोठ्या प्रमाणात येताना.त्यांना हे सर्व पाहताना वाईट वाटते.पण नाइलाज असतो…आता उद्या हे दृश्य नक्कीच पहायला मिळणार नाही अशी आशा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here