Home क्राईम डीवायएसपी `ब्राम्हणी`त

डीवायएसपी `ब्राम्हणी`त

63
0

राहुरी :बिहार येथील अल्पवयीन मुलीला पळून आणत ब्राम्हणी गावात बस स्टँड परिसरात एका भाडोत्री खोलीत काही महिन्यांपासून वास्तव्य करणाऱ्या स्थळाची पाहणी श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. शिवपुंजे व राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांनी रविवारी सकाळी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.

अफताब नामक १९ वर्षीय तरुणाने एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला बिहार येथून फूस लावून ब्राम्हणी येथे पळवून आणले. यापूर्वी कामानिमित्त ब्राह्मणीत आलेल्या आपल्या बहिणीच्या घरी काही दिवस राहिल्यानंतर सदर तरुण व पिडीत मुलगी स्वतंत्र भाडोत्री खोलीत राहिला गेले होते.दरम्यान संबंधित पीडित मुलीवर अत्याचार होत असल्याचे समजताच काही लोक जमा झाले. त्यांनी संबंधित तरुणाची यथेच्छ धुलाई करत त्याला राहुरी पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. अन् या घटनेमुळे जिल्ह्यात पून्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली. या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात सायंकाळी उशीरापर्यंत गून्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

सदर तरुणा विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती डीएसपी डॉ. शिव पुंजे यांनी पंचनाम्यादरम्यान गणराज्य न्यूजशी बोलताना दिली.
डीवायएसपी यांचे पथक सकाळी ब्राह्मणी दाखल होताच बघ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here