Home राहुरी सन्मान कर्तुत्वाचा…….

सन्मान कर्तुत्वाचा…….

40
0

ब्राम्हणी : गणराज्य न्यूजच्या व्यवस्थापक व इंद्रायणी बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव सौ.माया गणेश हापसे यांना व्यंकटेश मल्टीस्टेट & व्यंकटेश फाउंडेशनकडून सन्मान कर्तुत्वाचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गणराज्य न्यूज व इंद्रायणी बहुउद्देशीय संस्था याशिवाय एक उत्कृष्ट गृहिणी, महिला शेतकरी म्हणून माया हापसे यांच्या कामगिरीच व्यंकटेश मल्टीस्टेटकडून कौतुक करण्यात आल. याप्रसंगी मातोश्री सौभाग्यवती शकुंतला आप्पासाहेब हापसे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

व्यंकटेश मल्टीस्टेट & व्यंकटेश फाउंडेशन यांच्याकडून शुक्रवार 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या कर्तुत्वाचा सन्मान आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत गणराज्य कार्यालयात येवून व्यंकटेश मल्टीस्टेट टीमने सौ.माया गणेश हापसे यांना सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र देवून सन्मानीत केले.

 

ब्राम्हणी,उंबरे परिसरातील वैशिष्ट्य पूर्ण कामगिरी करणाऱ्या कर्तुत्वान निवडक महिलांचा व्यंकटेश मल्टीस्टेट टीमकडून जागतिक महिला दिनी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी डिम खेत्रे सर, बिएम पारखे सर,सेल्स ऑफिसर सोनवणे,क्लार्क ढवळे, कॅशियर प्राजक्ता बानकर आदी उपस्थित होते.

गणराज्य न्यूज चॅनलचे संपादक प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी व्यंकटेश मल्टीस्टेट टीमचे स्वागत करत त्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here