Home राहुरी उत्तमराव खुळे यांचे प्रमोशन

उत्तमराव खुळे यांचे प्रमोशन

35
0

राहुरी : ब्राम्हणीतील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक उत्तमराव हनुमंता खुळे सर यांची मांजरी येथील चंद्रगिरी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक (प्राचार्य) पदी आज नियुक्ती झाली.

सोमवार 15 जानेवारी रोजी नियुक्ती मिळाली.सकाळी 11 वाजता ऑर्डर मिळाली.दुपारनंतर नियुक्तीच्या ठिकाणी पद पदभार स्वीकारण्यासाठी ते ब्राम्हणीतून मांजरीत गेले आहे.आज संक्रांतीच्या दिवशी प्रमोशनची गुड न्यूज मिळाल्याने श्री.खुळे यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना आनंद व्यक्त केला.

ब्राम्हणी गावात सुमारे 27 वर्ष सर्वाधिक अद्यापनाचे काम केले.त्यापूर्वी प्रगती विद्यालय राहुरी, मानोरी,मांजरीत काही वर्ष सेवा केली.आजपर्यंत एकूण 31 वर्ष सेवा केली.विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख राहिली.

अनेक माजी विद्यार्थी विविध पदावर कार्यरत आहेत.विद्यार्थ्याच्या सुख दुःखात सहभागी होवून पारिवारिक नात जोपासण्याचे काम केले.पालक ग्रामस्थांशी त्यांचा संपर्क अधिक राहिला.दरम्यान माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन पद , संचालक पद भूषविले. मानोरी या आपल्या गावातील अनेक स्थानिक निवडणुका त्यांनी लढविल्या आहेत.आज 31 वर्षांनी त्यांना मुख्याध्यापक पदाची संधी मिळाली.मागील अनुभवाचा भविष्यात त्यांना फायदा होणार हे निश्चित……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here