Home राजकीय राहुरीत स्वाभिमान सभा व भव्य मेळावा

राहुरीत स्वाभिमान सभा व भव्य मेळावा

28
0

राहुरी :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या तुतारी या चिन्हाचे अनावरण प्रसंगी राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील व राहुरी तालुक्यातील कार्यकर्त्यांची स्वाभिमान सभा व भव्य मेळावा बुधवार दि ६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नवी पेठ राहुरी येथे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास सर्व कार्यकर्त्यानी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष मच्छिन्द्र सोनवणे यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटी नंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचे घड्याळ हे चिन्ह व पक्षाचे नांव बदलण्यास मंजुरी दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षास नवीन नांव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असे नवीन दिले असून पक्ष चिन्ह तुतारी असून या चिन्हाचे अनावरण व त्या निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित दर्जेदार पोवाडे, शिवकालीन चित्त थरारक मर्दानी खेळ, शिवकालीन सांकेतिक भाषेची प्रात्यक्षिके व बरेच काही यावेळी दाखवण्यात येणार असल्याचे श्री सोनवणे यांनी सांगितले.

तरी बुधवार दि ६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नवी पेठ येथे आमदार प्राजक्त तनपुरे यांचे वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाच्या वतीने तुतारी या पक्ष चिन्हाचे अनावरण या कार्यक्रमा निमित्त कार्यकर्त्याचा भव्य मेळावा आयोजित केला असून राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील व राहुरी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष मच्छिन्द्र सोनवणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here