Home Blog ब्राह्मणी ग्रामपंचायतकडून पत्रकारांचा सन्मान

ब्राह्मणी ग्रामपंचायतकडून पत्रकारांचा सन्मान

34
0

गणराज्य न्यूज ब्राम्हणी : ग्रामपंचायतच्यावतीने मंगळवार १६ जानेवारी रोजी सकाळी ग्रामपंचायत सभागृहामध्ये पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सुवर्णा बानकर या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदस्य महेंद्र तांबे यांनी केले. पत्रकार दत्तात्रय तरवडे, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष पत्रकार विनीत धसाळ, गणराज्य न्यूजचे संपादक गणेश हापसे, वृत्तपत्र विक्रेते श्रीकृष्ण तेलोरे आदींचा ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी सन्मान केला. दरम्यान सरपंच सौ.बानकर व पत्रकार बांधवांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी उपसरपंच गणेश तारडे, ग्रामविकास अधिकारी माणिकराव घाडगे, सदस्य अरुण बानकर, शांताराम हापसे,राहुल कानडे, बाबासाहेब गायकवाड, अनिल ठूबे, वृद्धेश्वर वैरागर,बाळासाहेब वाकडे,गिरीराज तारडे,सचिन हापसे,बाळासाहेब शेळके, ज्ञानेश्वर गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी पोपट हापसे,पोपट देशमुख, शशिकांत देशमुख, श्रावण वैरागर, सोपान वैरागर आदी उपस्थित होते.

समाजात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. गाव विकासासाठी पत्रकारांचे मार्गदर्शन व सहकार्य मोलाचे ठरत आहे. सर्वांगीण विकास करत एक आदर्श गाव म्हणून आपले सर्वाचे सहकार्य कायम अपेक्षित असल्याचे मत सरपंच सुवर्णा सुरेश बानकर यांनी व्यक्त केले.

संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून ब्राह्मणी गावातील जास्तीत जास्त प्रकरणे लावण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन योजनेचे अध्यक्ष तथा पत्रकार विनीत धसाळ दिले.

निवेदक,पत्रकार,संपादक या आधी ब्राह्मणी गावचा एक नागरिक म्हणून आम्हास अधिक अभिमान आहे.असे मत पत्रकार गणेश हापसे यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, गावाच्या नावासाठी सातत्याने आमचा प्रामाणिक प्रयत्न कायम राहील. सर्वांना सोबत घेऊन काम करण्यास अधिक आनंद वाटतो. गावाला कुटुंब मानत आम्ही पत्रकार म्हणून आमचं कर्तव्य बजावत आहे. आपण वारंवार आमच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकता. त्यामुळे आम्हास लढण्यास बळ मिळते. स्वतःसाठी नाही तर गावाच्या नावासाठी अन् विकासासाठी सदैव आम्ही आपल्या सोबत आहोत अन् राहणार आहे. जबाबदार नागरिक म्हणून आपण म्हणाल त्यावेळी आम्ही उभे राहू असे परखड विचार पत्रकार गणेश हापसे यांनी सत्कारला उत्तर देताना मांडले. ग्रामपंचायतने प्रथमच पत्रकारांना निमंत्रित करून सन्मान केला त्याबद्दल गणराज्य न्यूजचे संपादक गणेश हापसे यांनी ग्रामपंचायतचे विशेष आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here