Home राहुरी ब्राम्हणीत बोर्डला परवानगी

ब्राम्हणीत बोर्डला परवानगी

84
0

ब्राम्हणी : गावातील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी (बोर्ड परीक्षा) सेंटरला अखेर शिक्षण विभागाची परवानगी मिळाली.

15 जानेवारी रोजी आदर्श माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब जाधव यांना दहावी परीक्षा केंद्र मंजुरीचे पत्र मिळाले.स्व.विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूल, ब्राम्हणी व कुऱ्हे हायस्कूल चेडगाव या शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे.

आदर्श विद्यालय परीक्षा केंद्र व्हावे हे अनेक दिवसापासूनच गावाचं स्वप्न अखेर पूर्ण झाले. यासाठी ब्राह्मणी गावातील सर्व पदाधिकारी ,पालक वर्ग आणि आदर्श माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या प्रयत्नांना अखेर यश आले . आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात या वर्षापासून पुणे बोर्डाने दहावीसाठी परीक्षा सेंटरला मान्यता दिली आहे.

यापूर्वी विद्यालयाचे सर्व विद्यार्थी सोनई येथे दहावीच्या परीक्षेसाठी जात होती. जाण्या येण्याचा त्रास,वेळ, रोडवरील रहदारीचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत होता.शालेय कामकाजावर परिणाम होत होता.विद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब जाधव सर यांच्या संकल्पनेतून व विद्यार्थी,पालक ग्रामस्थांच्या मदतीने नव्याने निर्माण झालेल्या विद्यालयातील भौतिक सुविधांची पुणे बोर्डाने दखल घेतली.अन् विद्यालयाला परीक्षा केंद्र देण्याचे मान्य केले.आता सेंटर क्रमांक 2209 विद्यालयाला प्राप्त झाले आहे.

आदर्श विद्यालयात परीक्षा केंद्र सुरू झाले.आता परीक्षा कॉफी मुक्त, भय मुक्त व कोणतेही गालबोट न लागता व्यवस्थित पार पाडली जावी.यासाठी सर्वाची जबाबदारी आहे.त्यासाठी आता अधिक कडक शिस्त महत्वाची ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here