ब्राम्हणी : राहुरी-नेवासा तालुक्याच्या सरहद्दीवरील प्राचीन जागृत देवस्थान पोहीचा महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे आज महाशिवरात्री महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
आज 8 मार्च रोजी सकाळी कृष्ण कृपांकित ह.भ.प डॉ.विकासनंदजी महाराज मिसाळ यांचे हरी किर्तन होणार आहे. तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे…असे आवाहन आमदार शंकरराव गडाख पाटील मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.