Home राहुरी सोमवारी स्मार्ट किड्स अकॅडमीचे नियोजन

सोमवारी स्मार्ट किड्स अकॅडमीचे नियोजन

43
0

सोनई : स्मार्ट किड्स अकॅडमीच्या वतीने सोमवार 22 जानेवारी सकाळी 8 वाजता भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य सोनल परेश लोढा यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली.

देशभर आयोध्यातील प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठानिमित्त भव्य सोहळा होत आहे.त्यामित्त अनेक दिवसापासून स्मार्ट किड्स अकॅडमी च्यावतीने पूर्व तयारी सुरू आहे. राम लक्ष्मण सीता हनुमान यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी, लेझीम पथक,चित्र रथ,ढोल पथक मिरवणुकीच मुख्य आकर्षण ठरणार आहे. सकाळी स्मार्ट किड्स अकॅडमी येथून मिरवणुकीला प्रारंभ होईल.. पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हाव.दुपारी 12.30 ते 4 पर्यंत महाप्रसादाचे नियोजन आहे.तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्मार्ट किड्स अकॅडमीच्या वतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here