Home राहुरी माऊली यात्रा एक….. आनंदाचा सोहळा

माऊली यात्रा एक….. आनंदाचा सोहळा

74
0

ब्राम्हणी : स्व. विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये उद्या शुक्रवार दि. 16 फेब्रुवारी रोजी ” माऊली फनफेअर  (बाल आनंद मेळावा) “अर्थात एक अभिनव जत्रा याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

आजचे विद्यार्थी हे उद्याचे भावी नागरिक आहेत, शालेय विद्यार्थ्यांना सहशालेय उपक्रमाबरोबरच भावी जीवनामध्ये उद्योगाची ओळख व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक ज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी या हेतूने  N.E.P. अंतर्गत स्व. विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूलकडून नियोजन करण्यात येत आहे.
हा एक शैक्षणिक उपक्रम असून यामध्ये विद्यार्थ्यांनी छोटे दुकानदार ही भूमिका पार पाडून, गटाने किंवा वैयक्तिक स्टॉल मांडणे,प्रयोग सादर करणे व साहित्याची विक्री करणे व ज्ञान मिळवणे या गोष्टी समाविष्ट आहेत.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे वैयक्तिक अथवा ग्रुप डान्स, एकपात्री प्रयोग नाटक, गाणे अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले असून तरी सर्व विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे तसेच पालक वर्गाने देखील  आपल्या पाल्याचा आनंद द्विगुणित  करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here