Home राहुरी मॉर्निग वाक करणाऱ्यांना चोरट्यांची धास्ती

मॉर्निग वाक करणाऱ्यांना चोरट्यांची धास्ती

38
0

ब्राम्हणी : स्वतःच्या आरोग्यासाठी सकाळी घराबाहेर चालण्यासाठी बाहेर पडणाऱ्या ब्राम्हणीतील व्यक्तींना आता चोरट्यांची फिती वाटू लागली आहे.

नेहमी प्रमाणे रविवारी सकाळी अंधारातच अनिल कुंभकर्ण हे ब्राह्मणी जुन्या बाजारतळाकडून देवी मंदिराच्या रस्त्याने पायी जात असताना आदर्श विद्यालयाच्या पाठीमागील बाजूस वडाच्या झाडालगत पाठीमागून गुपचूप येणाऱ्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या शर्टच्या खिशातील मोबाईल हिसकावून पळ काढला. दरम्यान अनिल कुंभकर्ण यांनी त्यांच्या हातातील काठी त्याला फेकून मारण्याचा प्रयत्न केला.पण भामटा अंधाराचा फायदा घेऊन मोबाईल पळविण्यात यशस्वी झाला.

अनिल कुंभकर्ण यांच्याप्रमाणे अनेक वृद्ध,जेष्ठ महिला पुरुष सकाळी फिरायला जात असतात.पण आता भुरटे चोरटे पाळत ठेवून जवळील वस्तू पळवित असतील. तर,स्वताच्या शरीरासाठी नेमकी फिरायला जायचे का नाही.असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.याप्रकरणी अनिल कुंभकर्ण यांनी राहुरी पोलिसांकडे रीतसर लेखी तक्रार दिली असल्याचे समजते.पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here