Home राहुरी सप्ताह काळात ती दुकाने बंद ठेवा : मागणी

सप्ताह काळात ती दुकाने बंद ठेवा : मागणी

17
0

हरिनाम सप्ताह काळात ब्राम्हणीतील दारू,
मटण-चिकन दुकाने बंद ठेवण्याची मागणी

श्री क्षेत्र ब्राम्हणी येथे आदिशक्ती मुक्ताई समाधी सोहळ्यानिमित्त सालाबादप्रमाणे मंगळवार 28 मे पासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होत आहे. या काळात भाविक भक्त या कार्यात सहभागी होतात.पवित्र अशा या धार्मिक पर्वाच्या काळात दारू,मटण-चिकन दुकान , बिर्याणी हाऊस बंद ठेवण्यात यावे अशी जोरदार मागणी वारकरी परिवार, हिंदुत्ववादी संघटना,कट्टर हिंदू बांधवांकडून होत आहे. सदर दुकाने सुरू असल्याबाबत सोशल मीडियावर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला जात आहे.

28 मे ते 6 जून दरम्यान किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. 40 वर्षाची मोठी परंपरा असलेला आध्यात्मिक सोहळा आता तरुण आयोजकांच्या सहभागाने गत काही वर्षापासून भव्य-दिव्य स्वरूपाचा होत आहे.वारकऱ्यांच्या भावनांचा आदर करा.अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वर्षभर आपला व्यवसाय आपण करता. त्यास विरोध नाही पण किमान या पवित्र महत्वाच्या काळात आपण समजून घ्याल…अशी आशा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here