Home राहुरी ब्राम्हणी व उंबरे शाळेचा 99.02 % निकाल

ब्राम्हणी व उंबरे शाळेचा 99.02 % निकाल

23
0

ब्राम्हणी : आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ब्राम्हणी व भाग शाळा उंबरे या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 99.02℅ लागला आहे.
दोन्ही शाळा मिळवून विद्यालयात एकूण 205 विद्यार्थी परीक्षेला बसले असून त्यापैकी 203 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.

उंबरे शाळेची विद्यार्थिनी भवार समृद्धी लक्ष्मण हिने 91.00% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.
द्वितीय क्रमांक हापसे निखिल पोपट (89.80%) तर
तृतीय क्रमांक हापसे निकिता बाबुराव (88.60%) हिने मिळविला.

विद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब जाधव सर,उपप्राचार्य उगले जी.डी सर,पर्यवेक्षक शिरसाठ बी एल सर व
सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here