नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच ब्राह्मणी परिसरातील निलेश लंके समर्थकांनी मंगळवारी 4 जून रोजी सायंकाळी पारनेर तालुक्यातील हंगा या त्यांच्या गावी जावून लंके परिवारातील सदस्यांचा सत्कार केला.
लोकनेते खासदार निलेश लंके यांचे वडील,भाऊ आदींची कार्यकर्त्यांनी भेट घेवून आनंद व्यक्त केला.
स्कार्पिओ गाडीच्या मागील व पुढील बाजूस लोकनेते खासदार निलेश लंके यांचा रेडिमेड केला फोटो व खासदार असा उल्लेख सर्वाचा लक्ष वेधून घेत होता..
शनेश्वर ऑटोमोबाईल्सचे संचालक लोकनेते निलेश लंके यांचे कट्टर समर्थक किरण जाधव,सुनील शिरसागर,महेंद्र गटकळ,रावसाहेब वाकडे,शुभम नवले,अजित बर्डे आदी यावेळी उपस्थित होते.