ब्राम्हणी : विद्यार्थ्यांना बालवयातच व्यावहारिक ज्ञान मिळावे.भेटीदरम्यान त्यांना विविध प्रश्न निर्माण होवून ते समजावून घेतले जावे.या उद्देशाने स्व.विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मंगळवार २ फेब्रुवारी रोजी विविध ठिकाणांना भेटी देत विविध माहिती समजावून घेतली.
क्षेत्रभेट एक महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे.स्व.विलास बानकर स्कूल दरवर्षी विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी भेटी देत त्यांच्या ज्ञानात भर पाडण्याचे काम करत आहे.याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेता येते. भौगोलिक किंवा नैसर्गिक संकल्पनाचा व घटकांचा प्रत्यक्ष अनुभव क्षेत्रभेटीने घेता येतो. मानव व पर्यावरण यांच्यातील सहसंबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने भौगोलिक क्षेत्रभेटी अत्यंत उपयुक्त असतात.
या उद्देशाने बानकर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी माऊली दूध डेअरीमध्ये दूध प्रक्रिये बाबत माहिती घेतली.दूध शीतकरण, दुधापासून बनवण्यात येणारे दुग्धजन्य पदार्थ, दूध पिशवी पॅकिंग कशी करतात हे समजावून घेतले. बँक,पतसंस्थामध्ये पैसे काढणे व भरणे प्रक्रिया चेक लिहिणे, ठेव ठेवणे आदी आर्थिक कामकाज समजून घेतले.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून लोकांचे सोडविले जाणारे प्रश्न, राबविण्यात येणाऱ्या विविध योजना,कामाची पद्धत व अन्य बाबी समजावून घेतल्या.
विविध सण उत्सव यासाठी विविध मूर्ती,मडके,पणत्या बनविणाऱ्या कुंभार काम करणाऱ्या व्यावसायिकांना याशिवाय लोहार, सुतार,चांभार अशा विविध व्यावसायिक ठिकाणी भेटी देवून माहिती जाणून घेतली. यामध्ये विद्यार्थ्यांनी कारागीर व्यावसायिक यांचे कौशल्य समजून घेतले.
दरम्यान ब्राम्हणीच्या मंगळवारच्या आठवडे बाजाराजात जावून विद्यार्थ्यांनी भाजीपाला खरेदी व विक्री,वजन,मापे पद्धत समजावून घेत प्रत्यक्ष विक्री व खरेदी करत व्यवहार ज्ञान संपादन केले. या क्षेत्री भेटीदरम्यान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अश्विनी प्रकाश बानकर यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले व क्षेत्रभेटीचे महत्त्व सांगितले. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी स्व अनुभवातून अनेक महत्त्वपूर्ण माहिती घेतली व क्षेत्रभेट मोठ्या उत्साहात पार पडली.