Home राहुरी प्रथम पुण्यस्मरण

प्रथम पुण्यस्मरण

29
0

ब्राम्हणी : गावातील जेष्ठ व्यक्तिमत्व स्व.गं.भा भागिरथीबाई मच्छिंद्र तारडे यांचे उद्या सोमवार ८ जानेवारी रोजी प्रथम वर्षश्राद्ध त्यानिमित्त भावपूर्ण आदरांजली……

प्रथम पुण्यस्मरण निमित्त उद्या सकाळी खळवाडीमधील भाऊसाहेब तारडे यांच्या निवासस्थानी अडबंगनाथ संस्थानचे मठाधिपती ह भ प स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांचे किर्तन होणार आहे.

स्व.गं.भा भागिरथीबाई मच्छिंद्र तारडे यांची ओळख शिस्तप्रिय व्यक्तिमत्व म्हणून राहिली.पती मच्छिंद्र तारडे हे समाजकारण,राजकारण सक्रिय होते. ब्राह्मणी गावचं सलग १५ वर्ष सरपंच पद भूषवलं.त्यामुळे तारडे परिवाराच्या घरी माणसांची कायम वर्दळ राहत. मच्छिंद्र पाटील तारडे यांनी ब्राह्मणी गावच्या सरपंचपदासह राहुरी पंचायत समितीचे सभापती पद भूषवले.

दरम्यान घरी येणाऱ्या प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करत अडचणी सोडविण्याचा स्व. भागीरथीबाई यांचा प्रयत्न होता.पूर्वी पासून सधन प्रगतशिल शेतकरी कुटुंब असलेल्या या परिवाराकडे कायम काम करण्यासाठी शेत मुजरांचा राबता होता. शेतमजुरांची काळजी घेत पूर्ण शेती उत्तमरित्या सांभाळली.दोन्ही मुले व मुलींचे शिक्षण पूर्ण केले. पतीच्या निधनानंतर कुटुंबाची धुरा यशस्वी सांभाळली. भाऊसाहेब व बाळासाहेब दोन्ही मुले आपापल्या क्षेत्रात (प्रगतशील शेतकरी) काम करत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here