ब्राम्हणी : गाव तंटामुक्ती अध्यक्षपदी बाळासाहेब उर्फ भागवत रंगनाथ देशमुख यांची निवड करण्यात आली.

५ जानेवारी रोजी लोकनियुक्त सरपंच सौ सुवर्णा सुरेश बानकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ग्रामसभेत निवड करण्यात आली. तत्कालीन तंटामुक्ती अध्यक्ष सुरेशराव पंढरीनाथ बानकर यांचा राजीनामा जाहीर करत देशमुख यांची नूतन अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नवे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांच्या नावाची सूचना ग्रामपंचायत सदस्य महेंद्र तांबे यांनी मांडली. तर, त्यास ब्राह्मणी सोसायटीचे संचालक अशोक नगर यांनी अनुमोदन दिले.
स्व.केशव आप्पा हापसे यांच्या निधनानंतर तंटामुक्ती अध्यक्ष पदाच्या रिक्त जागी माणिक मळीबा तारडे यांची वर्णी लागली होती.2023 मध्ये सुरेशराव पंढरीनाथ बानकर यांची निवड करण्यात आली.आता पुन्हा देशमुख यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात आली.
बाळासाहेब देशमुख यांनी सन 2010 ते 2013 दरम्यान तंटामुक्ती अध्यक्ष पद भूषविले आहे.आता पुन्हा एकदा त्यांना अध्यक्ष पदाची संधी मिळाली. जनविकास मंडळाचे अध्यक्ष राहिलेल्या देशमुख यांना पार्टीने संधी पुन्हा दिली. देशमुख सोसायटीचे विद्यमान संचालक आहेत….