Home अहमदनगर 22 जानेवारीच सोनईत भव्य नियोजन

22 जानेवारीच सोनईत भव्य नियोजन

35
0

सोनई : येथील कौतुकीनदी शेजारील प्राचीन रामझिरा मंदिरात 22 जानेवारी रोजी भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवार 13 जानेवारी रोजी सकाळी जिल्हा परिषदचे अर्थ व पशुसंवर्धन समिती सभापती सुनील भाऊ गडाख, मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदय दादा गडाख यांनी सोनई ग्रामस्थांसह मंदिर स्थळी प्रत्यक्ष पाहणी करत कार्यक्रमाचे नियोजन केले.

 

सोनई शनिशिंगणापूर रस्त्यापासून कौतुकी नदीच्या पुला शेजारून काही क्षणाच्या अंतरावर प्रभू श्रीराम यांचे प्राचीन मंदिर आहे. सोनईच्या इतिहासात सर्वात आधी महादेव व रामझिरा मंदिराची ओळख आहे.

22 जानेवारी रोजी अयोध्या नगरीत प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यादरम्यान सोनई येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन 21 नवीन जोड्या पूजेसाठी बसणार असून असंख्य पुरोहितांच्या मंत्रोच्चारात पूजा सोहळा पार पडणार आहे. मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून मंदिराला कलर देण्यात आला आहे. सोनईतील मुख्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत डांबरीकरण करण्यात आले आहे.

22 जानेवारी रोजी सोनई परिसरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा ठेवण्यात आली आहे.यासाठी मंदिर परिसरात प्रशस्त मंडप उभारण्यात येणार आहे. महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजन करण्यासाठी सभापती सुनील गडाख व युवा नेते उदय गडाख यांच्या उपस्थित मंदिरात बैठक पार पडली. दरम्यान अनेकांनी चर्चेत भाग घेत 22 जानेवारीच्या नियोजनाबाबत आपले विचार मांडले. याप्रसंगी सरपंच धनंजय वाघ, उदय पालवे, राजाराम बोरुडे, आप्पासाहेब निमसे, सुभाष राख, संदीप कुसळकर,डॉ.रामनाथ बडे,मल्हारी वाघ, सुधीर दरंदले, उद्धव आव्हाड, सचिन पवार,दादासाहेब वैरागर, शिरीष बोरुडे आदींसह सोनई ग्रामस्थ व तरुण श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here