सोनई – येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या 45 वा वर्धापन दिनानिमित्त 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या 5 दिवसाच्या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज बुधवार 31 रोजी सायंकाळी 4 वाजता चला हवा येऊ द्या फेम डॉ. निलेश साबळे यांचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार यशवंतराव गडाख हे आहेत.
ग्रामीण भागातील मुला-मुलींना आपल्या परिसरात शिक्षण घेता यावे या दूरदृष्टीचा विचार करत मा.खा.यशवंतरावजी गडाख
यांनी ३१ जानेवारी १९७९ ला सोनईमध्ये मुळा एज्युकेशन सोसायटीच्या लावलेल्या रोपट्याचे आज ४५ वर्षात वटवृक्षात रूपांतर झाले. मा.खा.यशवंतरावजी गडाख यांच्या प्रेरणेने
मा.आ.शंकररावजी गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे अध्यक्ष मा. प्रशांतभाऊ गडाख यांच्या कल्पक व रचनात्मक नेतृत्वात संस्थेने अहमदनगर जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर देखील ‘ गरुड झेप ‘ घेत घरा, घरात शिक्षणाची गंगा नेत ‘ज्ञानमय ‘ज्योत प्रज्वलित केली. जगभरातील नाविन्यपूर्ण ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याचा वसा व वारसा घेतलेल्या आपल्या मुळा एज्युकेशन सोसायटीचा ४५ वा वर्धापन दिन बुधवार. दि .३१ जाने २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता मुळा एज्युकेशन सोसायटीच्या सोनईच्या प्रांगणात आपण विविध कार्यक्रमांनी साजरा करत आहोत हा ‘सुवर्णक्षण’ आपल्या सर्वांच्या प्रेरणादायी उपस्थित साजरा करण्याचा आमचा मानस आहे.या आनंदाच्या सोहळ्यात
हव्यात आपल्या प्रेमळ सदिच्छा महत्वाच्या आहेत.