Home राहुरी घे भरारी…………

घे भरारी…………

81
0

नेवासा – तालुक्यातील माका येथील कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूलचा ‘घे भरारी’ हा सांस्कृतिक महोत्सव व पारितोषिक वितरणाचा सोहळा शनिवारी (ता.२४) सायंकाळी ५ वाजता आयोजित केला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे यांनी दिली.

या सांस्कृतिक महोत्सवाची जोरदार पूर्व तयारी सुरू असून सदरच्या कार्यक्रमात पहाडी आवाजातील धमाकेदार व बहारदार सूत्रसंचालन, भव्य दिव्य रंगमंच, लखलखते लाईट डेकोरेशन, सुंदर रांगोळ्या, बलून डेकोरेशन, डिजे साऊंड सिस्टीम, सुंदर ड्रेपरी, कार्टून्स,सह विविध नृत्याविष्कार, मराठी, हिंदी गितांसह कोळीगीत, बैलगाडा शर्यत गीत, शेतकरी गीत, नाटिका व लावणीसह वारकरी गीतांचा लक्ष वेधून घेणारा नृत्याविष्कार पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूलचा घे भरारी हा सांस्कृतिक महोत्सव लक्षवेधी ठरणार आहे. यासाठी पालकांची व विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कूलचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here