Home राजकीय निर्भया प्रतिष्ठानकडून महिलांचा सन्मान

निर्भया प्रतिष्ठानकडून महिलांचा सन्मान

15
0

ब्राम्हणी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत निर्भया प्रतिष्ठान आयोजित शनिवार 16 मार्च रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता देवी मंदिर प्रांगणात कर्तुत्वान महिलांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निर्भया प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. अपर्णा प्रसाद बानकर यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली.

कार्यक्रमासाठी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे , नायब तहसीलदार संध्या दळवी, नायब तहसीलदार पुनम दंडीले,बाल विकास प्रकल्प अधिकारी गजानन शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान लकी ड्रॉ च्या माध्यमातून सोडतीमध्ये महिलांना पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे. कर्तुत्वार महिलांचा सन्मान व मनोगत यावेळी होणार आहेत. शाळेतील विद्यार्थिनी व महिलांसाठी प्रश्नमंजुषा कार्यक्रम आयोजित केला आहे. योग्य उत्तर देणाऱ्या महिलांना आकर्षक बक्षीस मिळणार आहे… उद्या आपण सर्वांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सौ.बानकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here