ब्राम्हणी : ग्रापंचायतच्या माध्यमातून15 वित्त आयोग अंतर्गत आरोग्य उपकेंद्र परिसरात ब्लॉक बसवणे (सुमारे 2 लाख रुपये रक्कम) व चारी नं ३ सोनई-राहुरी रस्त्यापासून पाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या (४ लाख रुपयांच्या) खडीकरणाच्या कामाचे उद्घाटन कार्यक्रम आज मंगळवार १६ रोजी पार पडला.
प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ. सुवर्णा सुरेश बानकर व उपसरपंच गणेश तारडे व ग्रामंचायत सदस्य यांच्या हस्ते पार पडले.याप्रसंगी सदस्य महेंद्र तांबे,अरुण बानकर, शांताराम हापसे,राहुल कानडे, बाबासाहेब गायकवाड, अनिल ठूबे, वृद्धेश्वर वैरागर,श्रीकृष्ण तेलोरे, श्रीकृष्ण राजदेव, कृष्णा महाराज जिरेकर,अशोक हापसे,आरोग्य सेवक प्रल्हाद खेडकर आकाश घाटोळे आदी उपस्थित होते.