Home राहुरी ब्राम्हणीत भव्य शिवजयंती उत्सव

ब्राम्हणीत भव्य शिवजयंती उत्सव

48
0

ब्राम्हणी – सोमवार 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता ब्राम्हणी जुन्या बाजार तळावरील स्टेज समोर शिवजयंती निमित्त छत्रपती शिवरायांना अभिवादन व शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,आदर्श माध्यमिक विद्यालय व स्व.विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी एकत्रित येत छत्रपती शिवरायांचा इतिहास ग्रामस्थ समोर विविध देखाव्याच्या माध्यमातून मांडणार आहेत. याप्रसंगी लेझिम पथकाचे नृत्य पोवाडा, मनोगत होणार आहे.तरी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच सौ सुवर्णा सुरेश बानकर यांनी केले. ग्रामपंचायतच्या माध्यमातून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here